Thursday, May 13, 2010

त्या पैलतिरावर



त्या पैलतिरावर मिळेल मजला थारा
सुहृदांची प्रेमळ सोबत आणि उबारा

इकडच्या तटावर झाले ध्वस्त निवारे
जळतात पावलांखाली क्रुद्ध निखारे
मी तळमळताही निर्विकार जन सारे
पण तिथे वाहतो प्रसन्न शीतल वारा !

ऐकली येथे आपुलकीची बोली
बहरली आशा मनात अंकुरलेली
सारखी विफलता व्यथा माझिया भाली
पलिकडे हासतो जीवन-श्रेय-फुलोरा !

पलिकडे मनोमय स्वप्नांचा संसार !
पलिकडे सुगंधित गीतांचा झंकार !
संतप्त उरास्तव वत्सल अमृतधार !
बहरला मळ्यांनी वैभवपूर्ण किनारा !















Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.


0 comments:

Post a Comment